आरोग्य विभाग भरती 2024 परीक्षेचा अभ्यासक्रम
आरोग्य विभाग भारती 2024 साठी महाराष्ट्र राज्यातील अनेक उमेदवार अर्ज करतील. लेखी परीक्षेच्या आधारे त्यांची निवड केली जाईल. यासाठी उमेदवारांना आरोग्य विचार अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून ते महाआरोग्य विचार भारती 2024 साठी चांगली तयारी करू शकतील. आम्ही या विभागात आरोग्य विभाग परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2024 प्रदान करत आहोत. आरोग्य विभाग महाराष्ट्र अभ्यासक्रम, आरोग्य विभाग लिखित परीक्षा पद्धत , आरोग्य विभाग परीक्षेचा तपशील आणि अभ्यासक्रम येथे पाहुयात जेणेकरून आपणास अभ्यास करण्या मदत होइल.
आरोग्य विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम:
गेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रचंड घोटाळा झाल्याची माहिती समोर आली होती. काही ठिकाणी परीक्षाही रद्द कराव्या लागल्या होत्या. गैरव्यवहार झाला होता. मात्र इथून पुढे तसंच काही होऊ नये असं उमेदवाराचं म्हणणं आहे.
जे विद्यार्थी वर्षानुवर्षे आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठी किंवा सरकारी नोकरीसाठी वाट बघत आहेत अशा उमेवारांना या भरतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ही परीक्षा होऊन निकाल लागल्यानंतर वेळेत उमेदवारांना पोस्टिंग मिळावं अशीच अपेक्षा उमेदवारांची आहे.
परीक्षार्थी उमेदवारांसाठी सूचना :
आरोग्य विभाग भरती 2024 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे:
- ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न.हे इंग्रजीमधून असतील.
- गट क.पदांकरीता.एकूण 100 प्रश्न. असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे.200 मार्कांची परीक्षा राहील.
- लिपिक.वर्गीय पदांकिरता मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील.एकूण 100 प्रश्नानं करीता. 200 गुणांची परीक्षा राहील.
- तांत्रिक संवर्गातील पदांकरिता मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील.
- वाहन चालक पदाकरिता. मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व पदासंभंतीत विषयावर 40 प्रश्न राहतील. व गुणवत्तेनुसार निवड करताना व्यावसायिक चाचणी 40. मार्काची राहील.
- गट ‘ड’ करिता.एकूण.50 प्रश्न.100 मार्काला राहतील.
- परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
आरोग्य विभाग निवड पद्धत :
आरोग्य विभाग परीक्षा ही मुख्य 3 भागात विभागली आहे’
- पूर्वपरीक्षा
- कौशल्य चाचणी (केवळ तांत्रिक पदांसाठी)
- दस्तऐवज पडताळणी
लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण १०० गुण, कालावधी- दोन तास. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. गट-ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा एकाच सत्रामध्ये होणार असल्यानं उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील. उमेदवारांनी ज्या पदांसाठी आणि ज्या कार्यालयांसाठी अर्ज केले असतील त्यानुसार त्यांना कोणत्या परीक्षाकेंद्रावर लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहावं लागेल, याबाबतची माहिती परीक्षा प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येईल.
महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षा पद्धत:
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवक अभ्यासक्रम दिला आहे. आरोग्य विभाग भारतीच्या लेखी परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे सहाय्य आहे.
वेळ : 2 तास
विषय | प्रश्नसंख्या | गुण |
सामान्य इंग्रजी | 15 | 30 |
मराठी | 15 | 30 |
सामान्य ज्ञान | 15 | 30 |
बुद्धिमता चाचणी | 15 | 30 |
तांत्रिक विषय | 40 | 80 |
एकूण | 100 | 200 |
आरोग्य विभाग लिपिक भरती परीक्षा नमुना :
विषय | प्रश्न | गुण |
मराठी | 25 | 50 |
इंग्रजी | 25 | 50 |
सामान्य ज्ञान | 25 | 50 |
बौद्धिक क्षमता चाचणी | 25 | 50 |
वेळ – 2 तास
आरोग्य विभाग नॉन मेडिकल आणि टेक्निकल परीक्षा पॅटर्न:
विषय | प्रश्न | गुण |
मराठी | 25 | 50 |
इंग्रजी | 25 | 50 |
सामान्य ज्ञान | 25 | 50 |
बौद्धिक क्षमता चाचणी | 25 | 50 |
विषयाशी निगडीत | 40 | 80 |
वेळ – 2 तास
आरोग्य विभाग भरती अभ्यासक्रम :
विषय: इंग्रजी
- Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense.
- Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
- Fill in the blanks in the sentence
- Simple Sentence structure
विषय : मराठी
- मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ प्रयोग, समानार्थी शब्द विरुध्दार्थी शब्द)
- भाषा सौंदर्य (उपमा, अलंकार, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी)
- प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
- योग्य जोड्या लावा.
विषय : सामान्य ज्ञान
- चालू घडामोडी (भारत आणि महाराष्ट्र)
- भारतीय इतिहास – नागरिकशास्त्र
- भारतीय भूगोल
- भारतीय संविधान
- सामान्य विज्ञान
- खेळ आणि संस्कृती.
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015
- माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित मूलभूत ज्ञान
विषय : तार्किक क्षमता
- अभियोग्यता चाचणी
- मूलभूत अंकगणित ज्ञान
- गणित (अंकीय, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी) सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान.