Krushi Vibhag Bharti Syllabus 2023

कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप 2023

महाराष्ट्र कृषी विभाग अभ्यासक्रम आणि स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक, सहायक अधीक्षक पदांसाठी परीक्षेचा नमुना प्रकाशित करण्यात आला आहे. सर्व पदांसाठी ऑनलाइन परीक्षा केवळ मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. या परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेतली जाईल. संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेद्वारे घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेत मिळालेले एकूण गुण आणि व्यावसायिक चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी उमेदवाराला एकूण गुणांपैकी किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

निवडीची पद्धत :- लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लघुलेखक (उच्च श्रेणी) या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा एकूण 120 गुणांची (प्रत्येकी 2 गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे 60 प्रश्न) घेतली जाईल. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास 30 गुण असतील. त्यानंतर उमेदवारांची व्यावसायिक / कौशल्य चाचणी [ व्यावसाईक चाचणी  (80 गुण) स्वतंत्रपणे घेण्यात येईल ] घेण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप मराठी आहे. सदर Online परीक्षा ही 75 मिनिटांची असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. Online परीक्षा आणि व्यावसायिक चाचणी मध्ये एकूण 45 % गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मेरीट लिस्ट जाहीर करण्यात येईल.

वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधिक्षक या  पदांसाठी ऑनलाईन परीक्षा एकूण 200 गुणांची घेतली जाईल. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास 50 गुण असतील. परीक्षेचे स्वरूप मराठी आहे. ही परीक्षा IBPS मार्फत घेण्यात येईल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. परीक्षेचा कालावधी 02 तास असेल गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी उमेदवारास 45 % मिळवणे आवश्यक आहे.

Krushi Vibhag Bharti Recruitment  2023 : Click Here
Krushi Vibhag Exam Pattern 2023 :
Subject Name No of QuestionsMarks
मराठी 1530
इंग्रजी 1530
सामान्य ज्ञान1530
बौद्धीक चाचणी1530
Total Marks60120

कालावधी : 2 तास

Subject Name No of QuestionsMarks
मराठी 2550
इंग्रजी 2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धीक चाचणी2550
Total Marks100200

कालावधी : 2 तास

Krushi Vibhag Bharti Syllabus/कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम :
English Language :  
 • Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
 • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
 • Fill in the blanks
 • Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
मराठी भाषा :    
 • मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
 • म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग,
 • शब्दसंग्रह,
 • वाक्यातील त्रुटी शोधणे
 • प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
सामान्य ज्ञान :  
 • इतिहास,
 • भूगोल,
 • भारताची राज्यघटना,
 • सामान्य विज्ञान,
 • चालू घडामोडी
 • इतर जनरल टॉपिक
बौद्धिक चाचणी :       
 • बुद्धिमत्ता चाचणी:
 • अक्षरमाला
 • संख्यामाला
 • समानसंबंध
 • वर्गीकरण
 • सांकेतिक भाषा
 • आकृत्यांची संख्या मोजणे
 • नातेसंबंध
 • निष्कर्ष किंचा अनुमान काढणे
गणित :
 • मुलभूत गणितीय क्रिया
 • घातांक शेकडेवारी
 • नफा-तोटा
 • सरळव्याज व चक्रवाढ व्याज
 • वय, काळ-काम-वेग,
 • सरासरी,
 • गुणोत्तर व प्रमाण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top