MPSC राज्यसेवा परीक्षा 2024 : संपूर्ण अभ्यासक्रम

Table of Contents

MPSC राज्यसेवा परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम : आपण राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे नियोजन योग्यप्रकारे करता येईल. या परीक्षेत एकूण 3 टप्पे असतात त्यातील पहिला टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा, त्यानंतर दूसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा व सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत असे परीक्षेचे स्वरूप असते. MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप तुम्ही खाली पाहू शकता : https://mpsc.gov.in/

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम :

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप :

पेपर क्रमांकप्रश्न संख्या गुणकालावधी
पेपर 1100200दोन तास
पेपर 280200दोन तास

एकूण गुण:- 400

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 01 चा अभ्यासक्रम :

MPSC पूर्व परीक्षा पेपर 1 : या पेपर ला सामान्यतः General Studies (GS) किंवा सामान्य अध्ययन असे म्हणतात. यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात. खालील प्रमाणे  आपण पेपर 1  सामान्य अध्ययनचा मराठी अभ्यासक्रम पाहुयात

पेपर 1 चा अभ्यासक्रम (एकूण गुण 200):

1) राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.

2) भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ.

3) महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल.

4) महाराष्ट्र आणि भारत राज्यव्यवस्था आणि शासन घटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, सामाजिक धोरणे इत्यादी.

5) आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी.

6) सामान्य विज्ञान.

7) पर्यावरण, परिसंस्था, पर्यावरणीय मुद्दे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 02 चा अभ्यासक्रम:

राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 02 : या पेपरला सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा CSAT असे म्हणतात. या मध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय येतात. खालील प्रमाणे आपण सामान्य बुद्धिमत्ता चाचणी पेपर 2 चा मराठी भाषेत अभ्यासक्रम पाहुयात

पेपर 2 चा अभ्यासक्रम (एकूण गुण 200)

1) मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन क्षमता.

2) संवाद आणि आंतर-कौशल्ये ज्ञान.

3) निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण.

4) सामान्य बुद्धिमत्ता चाचणी – बैठक व्यवस्था, दिशेचे ज्ञान, आकलन क्षमता, कूट-प्रश्न.

5) मुलभूत संख्याज्ञान आणि गणित, क्षेत्रफळ आणि घनफळ, काळ-काम-वेग, सरासरी, वय, शक्यता, विदा आकलन आणि स्पष्टीकरण, सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम :

मुख्य परीक्षेचे स्वरूप थोडक्यात खालीलप्रमाणे :

पेपर क्रमांक      विषय  प्राशन शांख्या   एकूण गुण    कालावधी
  1भाषा पेपर 1 (मराठी/इंग्रजी)      _   50+503 तास
  2भाषा पेपर 2 (मराठी/इंग्रजी)   50+50   50+501 तास
  3सामान्य अध्ययन – 01    150     1502 तास
  4सामान्य अध्ययन – 0२    150    1502 तास
  5सामान्य अध्ययन – 03    150    1502 तास
  6सामान्य अध्ययन – 04    150    1502 तास
       एकूण      800  

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम :

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा : भाषा पेपर 1 अभ्यासक्रम

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा भाषा पेपर 1 यामध्ये मराठी व इंग्रजी विषयातील भाषेचे ज्ञान व लेखन कौशल्य तपासले जाते

  • एकूण प्रश्न – 3 (मराठी) + 3 (इंग्रजी)
  • एकूण गुण – 50 (मराठी) + 50 (इंग्रजी)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वर्णनात्मक / पारंपारिक

भाषा पेपर 1 च अभ्यासक्रम :

भाग – 1 मराठी (गुण 50):

1. निबंध लेखन – दोनपैकी एका विषयावर सुमारे 400 शब्द

2. भाषांतर इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर, सुमारे अर्धे पान/2 परिच्छेद

3. सारांश लेखन

भाग – 2 इंग्रजी (English) (गुण 50):

1. Essay writing- An essay on one out of the two given topics/subject (About 400 words)

2. Translation – Marathi paragraph to be translated into English, approximately 1/2 Page/paragraphs

3. Precis writing

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा : भाषा पेपर 2 अभ्यासक्रम 

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा भाषा पेपर 1 यामध्ये मराठी व इंग्रजी विषयातील विद्यार्थ्याचे व्याकरण,शब्दसंग्रह,म्हणी,वाक्यप्रचार इत्यादि चा अभ्यास असतो

  • एकूण प्रश्न – 50 (मराठी) + 50 (इंग्रजी)
  • एकूण गुण – 50 (मराठी) + 50 (इंग्रजी)
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 1 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्याय

भाषा पेपर 2 च अभ्यासक्रम :

भाग – 1 मराठी (गुण 50):

1. व्याकरण – म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी/विरुध्दार्थी शब्द, शुध्दलेखन/विरामचिन्हे, इत्यादी

2. आकलन- उताऱ्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहिणे

भाग – 2 इंगर्जी (English) (गुण 50):

1. Grammar Idioms, Phrases, Synonyms/ Antonyms, Correct formation of words and sentences, Punctuation, etc.

2. Comprehension

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन (GS) 01 अभ्यासक्रम :

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन (GS) 01 विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र आणि भारतचा इतिहास आणि महाराष्ट्र आणि भारताचा भौतिक, आर्थिक, सामाजिक व मानवी भूगोल आणि कृषि शास्त्र या विषयावर असतो.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन (GS) 01 चा अभ्यासक्रम :

1.इतिहास:

1) ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना

2) आधुनिक भारताचा इतिहास

3) प्रबोधन काळ

4) वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था

5) भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास

6) ब्रिटीश शासनाविरोधी झालेले प्रसिध्द उठाव

7) गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टीकोन

8) ब्रिटीश प्रशासन अधीन घटनात्मक विकास

9) सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी

10) सत्तेच्या हस्तांतरणाकडे

11) स्वातंत्र्योत्तर भारत

12) महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक

13) महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा

2.भूगोल:

1) भूरुपशास्त्र

2) हवामानशास्त्र

3) मानवी भूगोल

4) आर्थिक भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)

5) लोकसंख्या भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)

6) पर्यावरणीय भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)

7) भूगोल आणि आकाश-अवकाशीय / अंतराळ तंत्रज्ञान

8) सुदूर संवेदन

9) रिमोट सेन्सिंगची मुलभूत तत्त्वे

10) एरियल फोटोग्राफी

11) जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग

3.कृषि:

1) कृषी परिसंस्था

2) मृदा

3) जल व्यवस्थापन

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन (GS) 02 अभ्यासक्रम :

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन (GS) 02 विद्यार्थ्यांचे भारतीय संविधान व राज्यप्रणाली तसेच महत्वाच्या कायद्यांचा अभ्यासक्रम आणि या मध्ये महाराष्ट्राच्या राजकीय प्रणालीविषय, पंचायत राज इत्यादि समाविष्ट असते.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन (GS) 02 चा अभ्यासक्रम :

1) भारताचे संविधान

2) भारतीय संघराज्य आणि राजकीय व्यवस्था

3) भारतीय प्रशासनाचा उगम

4) राज्यशासन व प्रशासन

5) ग्रामीण व नागरी स्थानिक शासन व प्रशासन

6) जिल्हा प्रशासन

7) पक्ष आणि हितसंबंधी गट

8) निवडणूक प्रक्रिया

9) प्रसार माध्यमे

10) शिक्षण पद्धती

11) प्रशासनिक कायदा

12) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966

13) काही सुसंबद्ध कायदे

14) समाज कल्याण व सामाजिक विधीविधान

15) वित्तीय प्रशासन

16) कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था

17) सार्वजनिक सेवा

18) घटनात्मक आणि वैधानिक संस्था

19) लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टीकोन आणि सिद्धांत

20) सार्वजनिक धोरण

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन (GS) 03 अभ्यासक्रम :

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन (GS) 03 विद्यार्थ्यांचे मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क अभ्यासक्रम, याशिवाय भारत आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना आणि प्रकल्प इत्यादीचा समावेश असतो.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4 (4 चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा होतील)
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन (GS) 03 चा अभ्यासक्रम :

1. मानव संसाधन विभाग:

1) भारतातील मानव संसाधन विकास

2) शिक्षण

3) व्यावसायिक शिक्षण

4) आरोग्य

5) ग्रामीण विकास

2. मानवी हक्क:

1) जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र

2) बालविकास

3) महिला विकास

4) युवकांचा विकास

5) आदिवासी विकास

6) सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास

7) वयोवृद्ध लोकांचे कल्याण

8) कामगार कल्याण

9) विकलांग व्यक्तींचे कल्याण

10) लोकांचे पुनर्वसन

11) आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना

12) ग्राहक संरक्षण अधिनियम 2019

13) मुल्ये, नीतितत्त्वे आणि प्रमाणक

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन (GS) 04 अभ्यासक्रम :

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन (GS) 03 विद्यार्थ्यांचे अर्थशास्त्र, नियोजन, कृषि अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान यातील तंत्रीक माहिती व चालू घडामोडी हा अभ्यासक्रम असतो. अर्थशास्त्र संकल्पना, भारतीय अर्थशास्त्र आणि महाराष्ट्रची अर्थव्यवस्ता इत्यादि अभ्यासक्रम असतो.

  • एकूण प्रश्न – 150   
  • एकूण गुण – 150  
  • निगेटिव्ह मार्किंग – 1/4
  • वेळ – 2 तास
  • स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

सामान्य अध्ययन (GS) 04 चा अभ्यासक्रम :

1.समग्रलक्षी अर्थशास्त्र:

1) समग्रलक्षी अर्थशास्त्र

2) वृद्धी आणि विकास

3) सार्वजनिक वित्त

4) मुद्रा / पैसा

5) आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल

2.भारतीय अर्थव्यवसता:

1) भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा

2) भारतीय शेती व ग्रामीण विकास

3) सहकार

4) मौद्रिक व वित्तीय क्षेत्र

5) सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था

6) उद्योग व सेवा क्षेत्र

7) पायाभूत सुविधा विकास

8) आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल

9) महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

10) कृषी

11) अन्न व पोषण आहार

3.विज्ञान व तंत्रज्ञान:

1) ऊर्जा विज्ञान

2) संगणक व माहिती तंत्रज्ञान

3) अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान

4) जैवतंत्रज्ञान

5) भारताचा आण्विक कार्यक्रम

6) आपत्ती व्यवस्थापन

MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम 2024 : FAQs

1) MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेत किती पेपर्स आहेत?

Ans – MPSC पूर्व परीक्षेत 2 आणि मुख्य परीक्षेत एकूण 9 पेपर आहेत.

2) MPSC राज्यसेवा परीक्षेत कोणते विषय असतात?

Ans –

  • GS पेपर 1 मध्ये इतिहास, भूगोल आणि भारतीय समाज यांचा समावेश आहे
  • GS पेपर 2 मध्ये भारतीय राजकारण, शासन, राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा समावेश आहे
  • GS पेपर 3 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी, पर्यावरण यांचा समावेश आहे
  • GS पेपर 4 मध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता असते.

MPSC

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top