महाराष्ट्र पोलीस भरती 2024 परीक्षेचे स्वरूप :
Maharashtra Police Bharati 2024: महाराष्ट्र राज्यात लवकरच पोलीस भरती (Maharashtra Police Bharti 2024) होणार आहे. पोलीस भरती करण्यासाठी वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. पोलिस भरती परीक्षा 2024 ची तयारी आणि उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासक्रम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या उमेदवारांना महाराष्ट्र पोलिसात नोकरी हवी आहे त्यांनी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अभ्यासक्रमाच्या योग्य ज्ञानाशिवाय तुम्ही परीक्षेची तयारी करू शकत नाही.
महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. महाराष्ट्र पोलिस भरती 2024 (Maharashtra Police Bharti 2024) साठी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: Click Here
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल निवड प्रक्रिया 2024:
महाराष्ट्र पोलीस भारतीची निवड खालीलप्रमाणे दोन टप्प्यांवर आधारित असेल.
- मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा (CBT) (100 गुण)
- Document पडताळणी
1. Maharashtra Police Physical Test Details (मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी):
पोलीस भरती 2024 खाकी बॅच Click Here
भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळविणार्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
शारीरिक चाचणी पुरुष:
- 1600 मीटर धावणे :- 20 गुण
- 100 मीटर धावणे :- 15 गुण
- गोळाफेक :- 15 गुण
- एकूण गुण :- 50 गुण
शारीरिक चाचणी (महिला):
- 800 मीटर धावणे :- 20 गुण
- 100 मीटर धावणे :- 15 गुण
- गोळाफेक :- 15 गुण
- एकूण गुण :- 50 गुण
2. महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा :
लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. उमेदवारांना 90 मिनिट एवढा कालावधी असेल, परीक्षा मराठी भाषेतच घेण्यात येईल. उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे, 40 टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
वेळ – 90 मिनिट
विषय | एकूण प्रश्न | गुण |
गणित | 25 | 25 |
मराठी | 25 | 25 |
सामान्य ज्ञान | 25 | 25 |
बुद्धिमता चाचणी | 25 | 25 |
एकूण गुण | 100 | 100 |
पोलीस भरती अभ्यासक्रम 2024 :
1) भूगोल (Geography) :-
- संपूर्ण भारताचा भूगोल
- महाराष्ट्राचा भूगोल
2) इतिहास (History) :-
- 1857 चा उठाव
- भारताचे व्हाईसरॉय
- समाज सुधारक
- राष्ट्रीय सभा
- भारतीय स्वतंत्र लढा
- ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
- 1909 कायदा
- 1919 कायदा
- 1935 कायदा
- हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी
3) पंचायत राज:-
- ग्राम प्रशासन
- समिती व शिफारसी
- घटना दुरुस्ती
- ग्रामसभा व ग्रामपंचायत
- ग्रामसेवक
- पंचायत समिती
- जिल्हा परिषद
- मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
- गटविकास अधिकारी BDO
- नगर परिषद / नगरपालिका
- महानगरपालिका
- ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन
4) सामान्य विज्ञान:–
- विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
- शोध व त्यांचे जनक
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
5) राज्यघटना:-
- भारतीय राज्यघटना
- राष्ट्रपती
- लोकसभा
- राज्यसभा
- विधानसभा
- विधानपरिषद
- वैशिष्ट्ये
- मूलभूत कर्तव्य
- मूलभूत अधिकार
- मार्गदर्शक तत्त्वे
- राज्यपाल
- मुख्यमंत्री
- उपराष्ट्रपती
- पंतप्रधान
- संसद
6) सामान्य ज्ञान:-
- विकास योजना:- संपूर्ण विकास योजना
- पुरस्कार- महाराष्ट्राचे पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, शौर्य पुरस्कार, खेळासंबंधी पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार
- क्रीडा
- खेळ व खेळाची संबंधित चषक
- प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
- खेळ व खेळाडूंची संख्या
- खेळाचे मैदान व ठिकाण
- खेळ संबंधित चिन्हे व प्रतिके
- महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
- आशियाई स्पर्धा
- राष्ट्रकुल स्पर्धा
- क्रिकेट स्पर्धा
7) मराठी:-
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- अलंकारिक शब्द
- लिंग
- वचन
- संधी
- मराठी वर्णमला
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- काळ
- प्रयोग
- समास
- वाक्प्रचार
- म्हणी
8) गणित:-
- संख्या व संख्याचे प्रकार
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
- कसोट्या
- पूर्णांक व त्यांचे प्रकार
- अपूर्णांक व त्यांचे प्रकार
- मसावि आणि लसावि
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- शेकडेवारी
- भागीदारी
- गुणोत्तर व प्रमाण
- सरासरी
- काळ-काम-वेग
- दशमान पद्धती
- नफा-तोटा
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- घड्याळावर आधारित प्रश्न
- घातांक व त्यांचे नियम
9) बुद्धिमत्ता चाचणी:-
- संख्यामालिका
- अक्षर मालिका
- वेन आकृत्या वर आधारित प्रश्न
- सांकेतिक भाषा
- सांकेतिक लिपी
- देशावर आधारित प्रश्न
- नातेसंबंध
- घड्याळावर आधारित प्रश्न
- तर्कावर आधारित प्रश्न
महाराष्ट्र पोलिस चालक भरती परीक्षेचे स्वरूप:
महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. महाराष्ट्र पोलिस भरती 2024 (Maharashtra Police Bharti 2024) अंतर्गत महाराष्ट्र पोलीस हवालदार चालक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.
1. Maharashtra Police Physical Test Details: (मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी)
शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1 : 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील
शारीरिक चाचणी (पुरुष):
- 1600 मीटर धावणे:- 30 गुण
- गोळाफेक:- 20 गुण
- एकूण गुण :- 50 गुण
शारीरिक चाचणी (महिला):
- 800 मीटर धावणे :- 30 गुण
- गोळाफेक :- 20 गुण
- एकूण गुण :- 50 गुण
वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी:-
- हलके मोटार चालविण्याची चाचणी :- गुण 25
- जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी :- गुण 25
- एकूण गुण :- गुण 50
- दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण आवश्यक
- कौशल्य चाचणी हो केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.
- कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
2. महाराष्ट्र पोलिस चालक लेखी परीक्षा:-
अ.क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | गणित | 20 | 20 |
2 | सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 20 | 20 |
3 | बौद्धिक चाचणी | 20 | 20 |
4 | मराठी व्याकरण | 20 | 20 |
5 | मोटार वाहन चालविणे /वाहतुकीचे नियम | 20 | 20 |
- लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल.
- परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग होणार नाही.
- एका प्रश्नाला 1 गुण अशा प्रकारे 100 प्रश्न असणार आहेत.
- उमेदवारांचा कालावधी ९० मिनिटांचा असेल
- परीक्षा मराठी भाषेतूनच घेतली जाईल.
- उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान ४०% गुण मिळणे आवश्यक आहे.