Maharashtra Talathi Syllabus 2023 in Marathi

महाराष्ट्र तलाठी भरती  2023 : महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महसूल विभागातील ग्रामपातळीवर काम करणारा गट क चा अधिकारी म्हणजे तलाठी. महाराष्ट्रात काही भागात तलाठ्याला पटवारी असे देखील म्हणतात. तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे सर्वसाधारणतः मराठी, बुद्धीमत्ता चाचणी, अंकगणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान व चालु घडामोडी आदी उपविषयांचा समावेश असतो. त्यातही सामान्य ज्ञान या उपविषयाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. या पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. सदर परीक्षा ही TCS मार्फत मराठी व इंग्लिश भाषेतुन घेतल्या जाईल.या लेखात आपण तलाठी भरती परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न याबद्दल माहिती बघणार आहोत. तलाठी भरती परीक्षेचे स्वरुप खाली दिले आहे.

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023

तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरती परीक्षेत एकूण 4 विषय असतात आणि प्रत्येक विषय 25 प्रश्नांच्या असतो प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात म्हणजे संपूर्ण पेपर 100 प्रश्न आणि 200 गुणांचा असतो. तलाठी भरती परीक्षा ही 2 तासांची असते. तसेच परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.

विषयप्रश्नांची संख्यागुण
मराठी भाषा2550
इंग्रजी भाषा2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक चाचणी  2550
एकूण100200

Maharashtra Talathi Bharti 2023 : Click Here

महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम 2023

महाराष्ट्र तलाठी भरती मराठी अभ्यासक्रम :
  • मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
  • म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
  • प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
महाराष्ट्र तलाठी भरती इंग्रजी अभ्यासक्रम :
  • Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
  • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
  • Fill in the blanks in the sentence
  • Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

Talathi Bharti Previous Year Question Paper : Click Here

महाराष्ट्र तलाठी भरती सामान्य ज्ञान अभ्यासक्रम :
  • इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी
  • माहितीचा अधिकार अधिनियम 2005
  • माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
महाराष्ट्र तलाठी भरती बौद्धिक चाचणी अभ्यासक्रम :

i) अंकगणित :

  • अंकगणित –  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
  • काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
  • सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन
  • मापनाची परिणामी

ii) बुद्धिमत्ता :

  • अंकमालिका, अक्षर मलिका
  • वेगळा शब्द व अंक ओळखणे
  • समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 FAQs

1) तलाठी पगार किती असतो?

Ans – तलाठी पदाचे एकूण वेतन इतर भत्ते वगळून २५५००-८१८०० दरम्यान आहे

2) तलाठी भारतीसाठी किती परीक्षा होतात?

Ans- तलाठी भरतीसाठी फक्त एकच परीक्षा होते.

3) तलाठी भरती परीक्षेत किती प्रश्न विचारले जातात?

Ans- तलाठी भरती परीक्षेत 100 प्रश्न असतात त्याच्यात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता असे चार विषय असतात.

4) तलाठी भारती परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन?

Ans- तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.

Scroll to Top