Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2023 :  राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून स्टेनो टायपिस्ट, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी/निम्न श्रेणी) या पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठीची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवरांना या भरतीसाठी http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. तर या भरती अंतर्गत एकूण किती जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव : लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी / उच्च श्रेणी )

पदसंख्या : ६० जागा

शैक्षणिक पात्रता :

1) लघुटंकलेखक :

1) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण.

2) लघुलेखन गती किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन गती किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र. 

2) लघुलेखक (निम्न श्रेणी) :

1) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण.

2) लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

3) लघुलेखक (उच्च श्रेणी) :

1) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण.

2) लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

Krushi Vibhag Bharti Syllabus 2023 : Click Here
वयोमर्यादा :
  • खुल्या प्रवर्गासाठी  : 18 ते 40 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी :18 ते 45 वर्षे
अर्ज शुल्क :
  • खुल्या प्रवर्गासाठी  : रु. ७२०/-
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी :रु. ६५०/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : ६ एप्रिल २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : २० एप्रिल 2023 3० एप्रिल 2023

Online अर्ज : Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top