MPSC PSI Syllabus 2024 in Marathi PDF

MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षा अभ्यासक्रम व स्वरूप 2024

प्रिय विद्यार्थी मित्रांनो , तुम्ही MPSC PSI भरती साठी अर्ज केला आहे का? आणि आता तुम्ही मराठीत MPSC PSI अभ्यासक्रम 2024 शोधत आहात. तुमच्यासाठी, आम्ही MPSC PSI परीक्षा 2024 साठी परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रमहे इथे उपलब्ध करून दिले आहे . खाली MPSC PSI अभ्यासक्रम 2024 मराठी स्वरूपात प्रदान केला आहे ज्यामुळे तुम्हाला तयारी सुरू करण्यास मदत होईल. म्हणून, ज्या उमेदवारांनी MPSI PSI अधिसूचना 2024 स्सठी अर्ज केला आहे ते परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी इथे दिलेला अभ्यासक्रम तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकतात.

MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षा अभ्यासक्रम 2024

MPSC PSI भारती 2024 अंतर्गत PSI रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी परीक्षा आयोजित करते. दरवर्षी आयोगाने त्याच्या अधिकृत वेबसाइट @mpsc.gov.in वर PDF फाइल स्वरूपात अधिसूचना जारी केली जाते आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित केल जाते, जर तुम्ही या पोस्टसाठी पात्र असेल किंवा अर्ज केला असेल तर तयारी सुरू करण्यासाठी तुम्ही खालील अभ्यासक्रम पाहू शकता. आम्ही खाली दिलेल्या तपशिलांचा संदर्भ घ्या आणि त्यावरून तुम्हाला PSI परीक्षेत कोणत्या अभ्यासक्रमावर कसे व कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत या विषयांची कल्पना मिळेल. उमेदवारांची निवड दोन भागात विभागली आहे. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा असे 2 भाग नंतर शारीरिक चाचणी व मुलाखत घेतली जाते, ह्या बद्दलचा पूर्ण अभ्यासकर्म आपण खाली पाहू.

परीक्षेचे टप्पे : १) संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण

                   २) मुख्य परीक्षा 400 गुण (पेपर 1 संयुक्त व पेपर 2 स्वतंत्र)

PSI शारीरिक चाचणी : एकूण गुण 100

PSI मुलाखत : 40 गुण

MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप
विषय व संकेतांकप्रश्न संख्याएकूण गुणदर्जामाध्यमकालावधीप्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी100  100  पदवी  मराठी आणि इंग्रजी1 तास  वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  
MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खालील प्रमाणे अभ्यासक्रम आहे .

1) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

2) नागरिक शास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन),

3) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास

4) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश व रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

5) अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोशीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण.

6) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र.

7) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुख्य परीक्षेचे स्वरूप

प्रश्नपत्रिकांची संख्या : दोन

एकूण गुण : ४००

पेपर 1 (संयुक्त पेपर) : 200 गुण (1 तास)

पेपर 2 (स्वतंत्र पेपर) : 200 गुण (1 तास)

विषय गुण प्रश्र्नसंख्या दर्जा माध्यम
पेपर क्र. 1    
मराठी10050मराठी- बारावीमराठी
इंग्रजी6030इंग्रजी- पदवीइंग्रजी
सामान्य ज्ञान4020पदवीमराठी व इंग्रजी
पेपर क्र. 2    
सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान200100पदवीमराठी व इंग्रजी
MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) संयुक्त मुख्य परीक्षा 1 अभ्यासक्रम

MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) संयुक्त मुख्य परीक्षा 1 अभ्यासक्रम खालील प्रमाणे

गुण 100

1) मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

2) इंग्रजी – Common vocabulary, sentence structure, grammar, use of idioms and phrases, and their meaning and comprehension of passage.

सामान्य ज्ञान:

1) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

2) माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

3) संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवासुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम – जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.

MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) स्वतंत्र मुख्य परीक्षा 2 अभ्यासक्रम

MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) स्वतंत्र मुख्य परीक्षा 2 अभ्यासक्रम खलील प्रमाणे

गुण 100

1) बुद्धिमत्ता चाचणी

2) महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical)भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiography) विभाग, हवामान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल  – लोकसंख्या व त्यांचे परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

3) महाराष्ट्राचा इतिहास –  सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्त्वांच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती तील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.

4) भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावना मागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे /ठळक वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.

5) मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्य घटनेतील तरतुदी, भारतातील मानवी हक्क व जवाबदार्‍या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी,(हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगार, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध)अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961 , महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

6) महाराष्ट्र पोलीस अधिनियम,1951 (Maharashtra Police Act)

7) भारतीय दंड संहिता, 1860 (Indian penal code)

8) फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ( Criminal Procedure Code)

9)  भारतीय पुरावा अधिनियम 1872 (Indian Evidence Act.)

MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुलाखत

गुण 40

मुख्य परीक्षेनंतर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी मुलाखत घेतले जाते. या मुलाखतीमध्ये शारीरिक चाचणी अंतर्भूत असते. निवडीच्या अंतिम टप्प्यामध्ये मुख्य परीक्षा व मुलाखत यातील मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी जाहीर केली जाते.

पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी मुलाखत 40 गुणांची असते. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अर्जामध्ये दिलेल्या माहितीनुसार कागदपत्रांची पडताळणी होते. त्यानंतरच उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतो व त्याची मुलाखत घेतली जाते.

MPSC पोलीस उपनिरीक्षक (PSI) शारीरिक चाचणी

गुण :- 100

पुरुषांसाठी-

1) गोळाफेक (वजन 7.260 किलो) – अंतर 7.50 केल्यास 15 गुण

2) पुल अप्स (8 पुल अप्स प्रत्येकी 2.5गुण एकूण 20 गुण

3) लांब उडी 4.50 मी. एकूण गुण 15 गुण

4) धावणे 800 मी. वेळ 2 मिनिटे 30 सेकंद 50 गुण

महिलांसाठी-

1) गोळाफेक (वजन 4 कि. ग्रॅ) अंतर 6 मी. 20 गुण

2) धावणे 200 मी. वेळ 35 सेकंद 40 गुण

3) चालणे 3 किमी. वेळ 23 मिनिटे 40 गुण

मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 गुण मिळविणे आवश्यक आहे. अशाप्रकारे 400 गुणांची मुख्य, 100 गुणांची शारीरिक चाचणी आणि 40 गुणांची मुलाखत एकूण 540 गुणांपैकी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड केली जाते.

FAQs

1) How many papers are there in MPSC PSI ?

Ans – PSI Pre exam consist of only one paper for three exams, then mains examination with two papers each of 100 marks, Physical Test and Interview of 40 marks.

2) Is there interview for MPSC PSI ?

Ans – Yes, There is interview at final stage of MPSC PSI

3) Can I crack MPSC without coaching ?

Ans – Candidates who aim to qualify for the MPSC exam can do so without coaching as well. They don’t necessarily need to enroll in any coaching to clear the exam if they do proper studies.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top