MPSC STI (राज्य कर निरीक्षक) अभ्यासक्रम 2024 मराठी
प्रिय विद्यार्थ्यांनो MPSC राज्य कर निरीक्षक (STI) भरती 2024 साठी अर्ज केले आहेत? होय आणि तुम्ही राज्य कर निरीक्षक (STI) अभ्यासक्रम शोधत आहात तर हे पेज तुम्हाला मदत करेल. या लेखात, आम्ही MPSC राज्य कर निरीक्षक (STI) अभ्यासक्रम 2024 वर मराठीत चर्चा केली आहे. MPSC STI परीक्षेचा तपशीलवार परीक्षा नमुना आणि अभ्यासक्रम मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम
दरवर्षी MPSC राज्य कर निरीक्षक (STI) परीक्षा आयोजित करते. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी MPSC राज्य कर निरीक्षक (STI) अभ्यासक्रम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हे तुम्हाला MPSC राज्य कर निरीक्षक (STI) परीक्षेची विवेकपूर्ण तयारी करण्यास मदत करेल. चला MPSC राज्य कर निरीक्षक (STI) अभ्यासक्रम संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा आणि परीक्षा पॅटर्न 2024 एक एक करून समजून घेऊया
प्रश्नपत्रिकांची संख्या : 02
संयुक्त पूर्व परीक्षा : प्रश्न 100 ( गुण 100)
मुख्य परीक्षा :
1) पेपर 1 : प्रश्न 50 (गुण 100)
2) पेपर 2 : प्रश्न 50 (गुण 100)
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप 2024 :
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) या साठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. ह्या पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असते. परीक्षेसाठी 1 तास वेळ दिला जातो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात.
विषय व संकेतांक | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
सामान्य क्षमता चाचणी | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | 1 तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम:
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) संयुक्त पूर्व परीक्षेसाठी साठि लागणारा संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पाहूया
1) चालु घडामोडी :- जागतिक तसेच भारतातील.
2) नागरिकशास्त्र :- भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन),
3) इतिहास :- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
4) भूगोल :- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
5) अर्थव्यवस्था :- भारतीय अर्थव्यवस्था– राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था :- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
6) सामान्य विज्ञान :- भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
7) बुध्दिमापन चाचणी व अंकगणित :- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षेतील संयुक्त पेपर 1 चे स्वरूप:
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. MPSC STI साठी लागणार्या संयुक्त पेपर 1 चे स्वरूप व अभ्यासक्रम पाहूया
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम |
मराठी | 100 | 50 | मराठी- 12th | मराठी |
इंग्रजी | 60 | 30 | इंग्रजी- 12th | इंग्रजी |
सामान्य ज्ञान | 40 | 20 | पदवी | मराठी व इंग्रजी |
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षेतील संयुक्त पेपर 1 चा अभ्यासक्रम:
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षेतील संयुक्त पेपर 1 चा अभ्यासक्रम खलील प्रमाणे
1) मराठी :- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतावरील प्रश्नांची उत्तरे
2) इंग्रजी :- Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
3) चालू घडामोडी :- जागतिक तसेच भारतातील.
4) माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
5) संगणक व माहिती तंत्रज्ञान :-आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम:
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर 2 या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. त्याचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे-
1) बुध्दिमत्ता चाचणी
2) महाराष्ट्राचा इतिहास :- सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७). महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.
3) महाराष्ट्राचा भूगोल :- महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डाँगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न.
4) भारतीय राज्यघटना :- घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कार्य, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, विधी समित्या.
5) नियोजन :- प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक ब आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रुपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरीबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल
6) शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास :- पायाभूत सुविधांची गरज व महत्त्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ जसे उर्जा, पाणीपुरवठा व मलनि:सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर, इत्यादी) दळणवळण (पोस्ट व तार दूरसंचार) रेडीओ, टि. व्ही. इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व या संबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ. डी. आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खाजगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशिलता
7) आर्थिक सुधारणा व कायदे :- पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम प्रश्न व समस्या GST, विक्रीकर, VAT, WTO, इत्यादी शी संबंधीत कायदे/नियम.
8) आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ :- जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WT आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ FDI व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडव पुरविणा-या संस्था, IMF जागतिक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडीट रेटींग.
9) सार्वजनिक वित्त व्यवस्था :- महसुलाचे साधन, टॅक्स नॉनटंक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शुन्याधारित अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा राज्य पातळीवरील VAT सार्वजनिक ऋण वाढ रचना आणि भार राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तुट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण केंद्र, राज्य व रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा केंद्र व राज्यस्तरावरील आढावा
MPSC राज्य कर निरीक्षक (STI) अभ्यासक्रम 2024 : FAQs
Ans – STI पदासाठी वयाची अट १८ ते ३८ वर्षे आहे. मागासवर्गीयांना यामध्ये सूट देण्यात येते.
Ans – होय, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 वा गुण वजा केला जाईल.
Ans – STI पदोन्नतीने विक्रीकर अधिकारी होऊ शकतो. पगार: 9,300-34,800 + ग्रेड पे 4300+ 4400 महागाई भत्ता आणि इतर भत्ते.