MPSC ASO (सहायक कक्ष अधिकारी) अभ्यासक्रम मराठी
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) या साठि लागणारा अभ्यासक्रम आपल्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. येथे वाचून अभ्यास करू शकतात. दरवर्षी MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) परीक्षा आयोजित करते. सहायक कक्ष अधिकारी (ASO) परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) अभ्यासक्रम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हे तुम्हाला MPSC ASO (सहायक कक्ष अधिकारी) परीक्षेची विवेकपूर्ण तयारी करण्यास मदत करेल. चला MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) अभ्यासक्रम संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा आणि परीक्षा पॅटर्न 2024 एक एक करून समजून घेऊया.
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2024
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) पूर्व आणि मुख्य परीक्षेला काही सारखे विषय आहेत त्याचा जर योग्य नियोजन करून अभ्यास केला तर मुख्य परीक्षेची पूर्व परीक्षेसोबत तयारी होऊ शकते. त्यामुळे अभ्यासक्रम पाहणे खूप गरजेचेच आहे.
प्रश्नपत्रिकांची संख्या : 02
संयुक्त पूर्व परीक्षा : प्रश्न 100 ( गुण 100)
मुख्य परीक्षा :
- पेपर 1 : प्रश्न 50 (गुण 100)
- पेपर 2 : प्रश्न 50 (गुण 100)
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप 2024
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. ह्या पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असते. परीक्षेसाठी 1 तास वेळ दिला जातो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात
विषय व संकेतांक | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
सामान्य क्षमता चाचणी | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | 1 तास | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) साठी संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) साठि लागणारा संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पाहूया
1) चालु घडामोडी :- जागतिक तसेच भारतातील.
2) नागरिकशास्त्र :- भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन),
3) इतिहास :- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
4) भूगोल :- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
5) अर्थव्यवस्था :- भारतीय अर्थव्यवस्था– राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था :- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
6) सामान्य विज्ञान :- भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
7) बुध्दिमापन चाचणी व अंकगणित :- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) साठी मुख्य परीक्षेतील संयुक्त पेपर 1 चे स्वरूप:
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) या साठी लागणार्या संयुक्त पेपर 1 चे स्वरूप व अभ्यासक्रम पाहूया
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम |
मराठी | 100 | 50 | मराठी – 12th | मराठी |
इंग्रजी | 60 | 30 | इंग्रजी – 12th | इंग्रजी |
सामान्य ज्ञान | 40 | 20 | पदवी | मराठी व इंग्रजी |
एकूण गुण | 200 | 100 |
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) साठी मुख्य परीक्षेतील संयुक्त पेपर 1 चा अभ्यासक्रम :
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) साठी मुख्य परीक्षेतील संयुक्त पेपर 1 चा अभ्यासक्रम खालील प्रमाणे
1) मराठी :- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतावरील प्रश्नांची उत्तरे
2) इंग्रजी :- Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
3) चालू घडामोडी :- जागतिक तसेच भारतातील.
4) माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
5) संगणक व माहिती तंत्रज्ञान :-आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) मुख्य परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम:
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) मुख्य परीक्षा पेपर 2 या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) मुख्य परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम खालील प्रमाणे
1) बुध्दिमत्ता चाचणी
2) महाराष्ट्राचा इतिहास :- सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७).
3) महाराष्ट्राचा भूगोल :- महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डाँगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या (Population) migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परीणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न.
4) भारतीय राज्यघटना :- घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कार्य , अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, विधी समित्या.
5) राजकीय यंत्रणा केंद्र सरकार, केंद्रिय विधिमंडळ आणि राज्य सरकार व प्रशासन .
6) जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
7) न्यायमंडळ :- न्यायमंडळाची रचना, एकात्मीक न्यायमंडळ कार्य. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.
8) नियोजन :- प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक ब आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रुपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरीबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.
MPSC सहायक कक्ष अधिकारी (ASO) अभ्यासक्रम 2024 : FAQs
Ans – ASO पदासाठी वयाची अट १८ ते ३८ वर्षे आहे. मागासवर्गीयांना यामध्ये सूट देण्यात येते.