महसूल विभागाच्या वतीने महाराष्ट्र मध्ये 4644 तलाठी पदांसाठी मेगा भरती 2023
महसूल विभागाच्या वतीने राज्यात रिक्त असलेल्या 4644 तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिकेऐवजी एकच प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे उमेदवार एकाच जिल्ह्यात अर्ज करून परीक्षेत सहभागी होऊ शकतो. तलाठी संवर्गातील गट क पदे थेट सेवा पद्धतीने भरण्याची परवानगी आहे. तलाठी भारती 2023 बाबतचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे. वेतनश्रेणी, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशीलांसह महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी नोकरीच्या रिक्त जागांविषयी सर्व तपशील येथे उपलब्ध आहेत. राज्यात एकूण 4644 तलाठी पदे रिक्त असून, त्यासाठी ही भरती होणार आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे.
Talathi Syllabus 2023 and Exam Pattern : Click Here
पदाचे नाव: तलाठी.
एकुण जागा : 4644
अ.क्र. | जिल्हा | पद संख्या | अ.क्र. | जिल्हा | पद संख्या |
1 | अहमदनगर | 250 Posts | 19 | नागपूर | 117 Posts |
2 | अकोला | 41 Posts | 20 | नांदेड | 119 Posts |
3 | अमरावती | 56 Posts | 21 | नंदुरबार | 54 Posts |
4 | औरंगाबाद | 161 Posts | 22 | नाशिक | 268 Posts |
5 | बीड | 187 Posts | 23 | उस्मानाबाद | 110 Posts |
6 | भंडारा | 67 Posts | 24 | पालघर | 142 Posts |
7 | बुलढाणा | 49 Posts | 25 | पुणे | 383 Posts |
8 | चंद्रपूर | 167 Posts | 26 | रायगड | 241 Posts |
9 | धुळे | 205 Posts | 27 | रत्नागिरी | 185 Posts |
10 | गडचिरोली | 158 Posts | 28 | सांगली | 98 Posts |
11 | गोंदिया | 60 Posts | 29 | सातारा | 153 Posts |
12 | हिंगोली | 76 Posts | 30 | सिंधुदुर्ग | 143 Posts |
13 | जालना | 118 Posts | 31 | सोलापूर | 197 Posts |
14 | जळगाव | 208 Posts | 32 | ठाणे | 65 Posts |
15 | कोल्हापूर | 56 Posts | 33 | वर्धा | 78 Posts |
16 | लातूर | 63 Posts | 34 | वाशिम | 19 Posts |
17 | मुंबई उपनगर | 43 Posts | 35 | यवतमाळ | 123 Posts |
18 | परभणी | 105 Posts | 36 | मुंबई शहर | 19 Posts |
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 : शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
- तलाठी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम आणि स्वरूप 2023 : Click Here
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी महत्वाची माहिती :
- तलाठी भरतीची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 : वयाची अट
- खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे,
- मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
तलाठी भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका : Download PDF
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 : अर्ज शुल्क
- खुला प्रवर्ग: ₹ 1000/-,
- राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹ 900/-.
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 : महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 26 June 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 July 2023 25 July 2023
Apply Online : Click Here